शोधीत गाव आलो | Shodhit gav alo Marathi Lyrics

शोधीत गाव आलो | Shodhit gav alo Marathi Lyrics

गीत -विजय कुवळेकर
संगीत – आनंद मोडक
स्वर- जयश्री शिवराम ,  रवींद्र साठे
चित्रपट-तू तिथं मी


शोधीत गाव आलो स्वप्‍नांत पाहिलेले
किती रंग जीवनाला व्यापून राहिलेले

कधी ऊन झेलले अन्‌ कधी तृप्‍त चांदण्यात
सार्‍या ऋतूत जपला हृदयातला वसंत

दिस मावळेल आता उजळेल चांदरात
जाता सरून रजनी येते नवी पहाट
चाले अखंड पुढती ऋतुचक्र हे अनंत

Leave a Comment