श्रीरंग सावळा तू | Shrirang Sawla Marathi Lyrics

श्रीरंग सावळा तू | Shrirang Sawla Marathi Lyrics

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल मोहिले
स्वर- अरुण दाते ,  कृष्णा कल्ले
राग- दरबारी

श्रीरंग सावळा तू मी गौरकाय राधा
ही प्रीत दो जिवांची अद्वैत रे मुकुंदा
ये राधिके अशी ये होऊन प्रीति मुग्धा
नयनांतुनी फुलू दे अपुल्या अमोल छंदा
ये प्रेमले अशी ये फुलवित सुप्रभाती
प्रणायातल्या सुरांनी सजवीत चांदराती
मिटल्या फुलापरी त्या तव नील लोचनांत
लावून भारलेली भावूक प्रीति ज्योत
का लोचनी प्रिया रे हृदयी तुझेच रूप
दिनरात लाविते मी येथे तुझाच दीप
गाते तुझेच गाणे कथनी तुझे उखाणे
तुझियाकडेच धावे मनपाखरू दिवाणे
येताच मी परंतु तुझिया समीप का गे
होसी अबोल वेडी विणीशी मनात धागे
त्या चित्त पाखराला लपवून ठेविसी का
भारावुनी अशी या नेत्रांत पाहसी का
ते बोलके अबोल क्षण सर्व आठवावे
मम लाजर्‍या दिठीत सारेच साठवावे
हा छंद या जिवाला जडवी तुझीच मूर्ती
मी मंगलातुनी या गुंफी अभंग नाती

Leave a Comment