सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव आणि कोल्हा | Marathi Katha | Marathi Story

एक गाढव रानात फिरत असता त्याला एक सिंहाचे कातडे सापडले. ते पांघरून तो रानात हिंडू लागला. त्याला पाहून हा सिंहच आहे अशा समजुतीने सगळे प्राणी भिऊन पळू लागले. याप्रमाणे कित्येक दिवस त्या गाढवाने मोठी अंदाधुंदी करून सगळ्या जनावरांस चकविले. पुढे एके दिवशी एक कोल्हा त्याला दिसला. तो त्याच्यावर मोठ्या आवेशाने चालून गेला आणि सिंहासारखा आवाज काढण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागला, पण गाढवाला सिंहासारखा आवाज कसा काढता येणार ? अर्थातच त्याचा आवाज ऐकून कोल्हा त्याला म्हणाला, ‘ मामा, आता पुरे करा. आपण जर क्षणभर आपली जीभ आवरली असती तर मीही आपणास सिंह समजून घाबरलो असतो, पण आपल्या ओरडण्यावरून आपण कोण आहात ते मी बरोबर ओळखलं आहे !’

तात्पर्य

– दुसर्‍याची नक्कल हुबेहूब करण्याचे काम फार कठीण आहे. नुसत्या पोशाखाच्या नकलेने काही भोळी माणसे कदाचित फसतील पण चतुर माणसे आवाजावरून व इतर हालचालीवरून माणसाचे खरे स्वरूप काय आहे, हे ओळखल्याशिवाय राहणार नाहीत.

Leave a Comment