सोबतीला चंद्र देते | Sobatila Chandra Dete Marathi Lyrics

सोबतीला चंद्र देते | Sobatila Chandra Dete Marathi Lyrics

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – लता मंगेशकर


सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते
तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते

चांदण्यांच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्‍नात आले
या निळ्या बेहोष रात्री मी तुझ्याशी एक झाले
मीलनाला साक्ष होते ते तुला मी श्वास देते

संचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घे तू
घाल ती वेडी मिठी अन्‌ एकदा वेढून घे तू
जन्मती हे सूर जेथे ते तुला आभास देते

तू कुठेही जा, सुखी हो, चंद्र माझा साथ आहे
गीत माझे घेउनी जा, प्राण माझा त्यात आहे
तृप्‍तिला हेवा जिचा ती लोचनांची प्यास देते

Leave a Comment