सूर सनईंत नादावला | Sur Sanait Nadavala Marathi Lyrics
गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल-अरुण
स्वर – उषा मंगेशकर
Sur Sanait Nadavala Marathi Lyrics
सूर सनईंत नादावला
पूर नयनांत या दाटला
सांग विसरू कशी मी तुला
पुण्यवंतापरी या घरी जन्मले
सात जन्मांतले भाग्य जे लाभले
सात या पाउली, विस्मरू मी कशी-
मूर्त आई तुझी वत्सला ?
सान होते कशी मूक वेडी कळी
अमृताने तुझ्या वाढले मी खुळी
रोमरोमी जयाच्या तुझ्या भावना
गंध विसरेल का गे फुला ?
पूस डोळे नको हुंदके, आंसवे
चालले गे जरी मी पतीच्यासवें
माउली तू मला साउली जीवनीं
मी तुझी लाडकी प्रेमला !