सुख भरुन सांडते | Sukh Bharun Sandate Marathi Lyrics
गीत – शान्ता शेळके
संगीत – राम कदम
स्वर -, सुमन कल्याणपूर
चित्रपट – भाग्यलक्ष्मी
Sukh Bharun Sandate Marathi Lyrics
सुख भरुन सांडते घरिदारी
मज काय उणे या संसारी ?
गंगेहुन मन निर्मळ प्रेमळ
सासू नच ही माता केवळ
कर वत्सल फिरता पाठिवरी
मज काय उणे या संसारी ?
जशि वार्याची झुळुक अनावर
नणंद तैशी गोड खेळकर
उतरला स्वर्ग या भूमिवरी
मज काय उणे या संसारी ?
पूर्वपुण्य मम ये साकारून
पतिचरणांचे घडले पूजन
ही जोड मिळावी जन्मभरी
मज काय उणे या संसारी ?