सुकुनी गेला बाग | Sukuni Gela Baag Marathi Lyrics
गीत – शान्ता शेळके
संगीत – राम कदम
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – भाग्यलक्ष्मी
Sukuni Gela Baag Marathi Lyrics
सुकुनी गेला बाग
आठवणींच्या मुक्या पाकळ्यां पडल्या जागोजाग
आज फुलांतुन सुगंध उडले
पाचोळ्यातच पाऊल बुडले
जुन्या हरवल्या पाउलवाटा, कसा काढणे माग ?
त्या तरुखाली एकामेकां
दिल्याघेतल्या आणाभाका
पानांसंगे आशा जाळीत ये ग्रीष्माची आग
पालवीतली विटली नक्षी
झाडांवरती मुकेच पक्षी
गीत गळ्यातच गुदमरले त्या पुन्हा न येई जाग