स्वप्‍नातल्या कळ्यांनो उमलू | Swapanatalya Kalyano Marathi Lyrics

स्वप्‍नातल्या कळ्यांनो उमलू | Swapanatalya Kalyano Marathi Lyrics

गीत -म. पां. भावे
संगीत – अनिल-अरुण
स्वर – आशा भोसले

स्वप्‍नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा
नैराश्य कृष्णमेघी आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजुनी प्रीति फुलोनि यावी
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा

Leave a Comment