स्वप्‍ननगरच्या सुंदर माझ्या | Swapnanagarchya Sundar Majhya Marathi Lyrics

स्वप्‍ननगरच्या सुंदर माझ्या | Swapnanagarchya Sundar Majhya Marathi Lyrics

गीत – कुसुमाग्रज
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – आशालता वाबगावकर
नाटक – विदूषक


Swapnanagarchya Sundar Majhya Lyrics

स्वप्‍ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती
मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा

रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला
जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला
हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा

Leave a Comment

x