स्वप्‍नावरी स्वप्‍न पडे | Swapnavari Swapna Pade Marathi Lyrics

स्वप्‍नावरी स्वप्‍न पडे | Swapnavari Swapna Pade Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – आकाशगंगा


Swapnavari Swapna Pade Marathi Lyrics

स्वप्‍नावरी स्वप्‍न पडे, नीज ना मला
जागेपणी आठविते सारखी तुला !

प्रीतीचे घोष तुझ्या, कानी ऐकते
मूर्तीचे चित्र तुझ्या, पदरी झाकिते
अंतरिचा भाव कधी तुज न उमगला !

भोळी मी पोर तुला दुरून पूजिते
सांगावे गूज असे रोज योजिते
काय करू साधेना कठीण ती कला !

हळूच तुझ्या छायेशी आज बोलते
शबरीच्या बोरांची शपथ तुला घालते
भिल्लिणिची भक्ती त्या राम समजला !

Leave a Comment