Connect with us

मराठी बोल

स्वर्ग हा नवा | Swarga Ha Nava | Marathi Lyrics

Published

on

Swarga Ha Nava song lyrics, this song is sung by Rushikesh Rande, Yogita Godbole. Swarga Ha Nava song is composed by Ajay-Atul.

गीत – गुरु ठाकूर
संगीत – अजय-अतुल
स्वर – हृषिकेश रानडे ,  योगिता गोडबोले
चित्रपट – तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं


स्वर्ग हा नवा, वाटतो हवा
साथ ही तुझी जणु उन्हात चांदवा

ऐक साजणी, या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा

चिमणे घरटे सजले साजरे
इवले सुख हे फुलले आज रे
भरले घर हे आनंदाने
मन हे गाते गीत तुझे ऐक ना
प्रेमगीत छेडितो ऊरात पारवा

बघुनी अपुले घर स्वप्‍नातले
सजणी झुलले तनमन, नाचले
जुळले नाते दोन जिवांचे
जीव हे झाले एकरूप साजणा
साथ ही तुझी जणु उन्हात चांदवा