तळव्यावर मेंदीचा अजून | Talwyawar Mendicha Ajun Marathi Lyrics
गीत -शांताराम नांदगावकर
संगीत -अरुण पौडवाल
स्वर- अनुराधा पौडवाल , सुरेश वाडकर
Talwyawar Mendicha Ajun Marathi Lyrics
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोला
गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे
बट हळवी वार्यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला
पवनातुनी शीतलता दाटुनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे धुंदधुंद झाला
ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात
मिटुनी पंख खग निवांत शांत तरूलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला