ते स्वप्‍न भाववेडे | Te Swapna Bhaav vede Marathi Lyrics

ते स्वप्‍न भाववेडे | Te Swapna Bhaav vede Marathi Lyrics

गीत – वंदना विटणकर
संगी – सुधीर फडके
स्वर – उषा अत्रे-वाघ ,  सुधीर फडके


ते स्वप्‍न भाववेडे नयनी समूर्त होते
फुलते मनात माझ्या अपुले अबोल नाते

ती भेट पापण्यांची धुंदावल्या क्षणांची
कायाच जाहली रे जणु बासरी विजेची
त्या मूक गुंजनाच्या धुंदीत मी नहाते

माझ्याहुनी सखे ग झाली अधीर वाणी
शब्दास रूप येता ती लाजली कहाणी
परि ओढ अंतरीची खुलुनी असीम होते

पाऊल प्रीतिचे हे चाहूल मन्मथाची
काहूर गोड वाटे, ही खूण या पथाची
दाही दिशांत आता घुमती अनंग-गीते

Leave a Comment