थकले प्रिया कधीची मी | Thakle Priya Kadhichi Me Marathi Lyrics

थकले प्रिया कधीची मी | Thakle Priya Kadhichi Me Marathi Lyrics

गीत – वंदना विटणकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – अनुराधा पौडवाल
चित्रपट – चोराच्या मनात चांदणे


थकले प्रिया कधीची मी वाट पाहुनी
वाटे तुझ्याविना रे मैफल्‌ सुनी सुनी

त्या रेशमी स्मृतींचा श्रुंगारसाज ल्याले
सुखस्वप्‍न मीलनाचे हृदयी अधीर झाले
गाऊ कशी रसीली मी प्रीतरागिणी ?

का ओसरून गेली फुलताच स्वप्‍नमाया
घायाळ लोचनांना भासे उदास दुनिया
छळते मला नशीली ती धुंद मोहिनी

भारावल्या मनी रे घुमतो तुझा पुकारा
झाला तुझ्याचसाठी आतुर जन्म सारा
ध्यासात आज गेले हे विश्व लोपुनी

Leave a Comment

x