ठाऊक नाही मज काही | Thauk Nahi Maz Kahi Marathi Lyrics

ठाऊक नाही मज काही | Thauk Nahi Maz Kahi Marathi Lyrics

गीत – मधुसूदन कालेलकर
संगीत – राम कदम
स्वर – स्‍नेहल भाटकर ,  वसुमती दोंदे
चित्रपट – एक धागा सुखाचा

Thauk Nahi Maz Kahi Marathi Lyrics

ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ?

मऊ जशी ती साय दुधाची होती आई का तशी मायेची ?
बागेतील ते कमल मनोहर आई होती का तशीच सुंदर ?
देवाघरी का एकटी जाई ?
ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ?

चिउकाऊची कथा चिमुकली सांगत होती का ती सगळी ?
अम्हांसारखे शुभंकरोती म्हणे रोज का देवापुढती ?
गात असे का ती अंगाई ?
ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ?

मऊ साइहून आई प्रेमळ ! गंगेहून ती आहे निर्मळ
अमृताचे घास भरविते आभाळापरी माया करीते
आईवाचून मीही विरही
ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ?

Leave a Comment

x