टिफीन सर्व्हिसेस व्यवसाय कसा सुरु करायचा | Tiffin Service Business Plan In Marathi

टिफीन सर्व्हिसेस व्यवसाय कसा सुरु करायचा | Tiffin Service Business Plan In Marathi

Tiffin Service Business Plan In Marathi: शहरी व निमशहरी भागांत नोकरी, व्यवसाय, शिक्षण यानिमित्ताने लोक येत असतात. अनोळखी शहरात एकट्याने राहताना जेवणाची गैरसोय होत असते. अशा वेळी आपल्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळपास जेवणाची व्यवस्था कोठे होईल याची चाचपणी लोक करत असतात. घरापासून दूर असल्यावर घरच्या जेवणाची चव हवी असते. त्यामुळे हॉटेलचे खाणे टाळले जाते.

शहरी व निमशहरी भागांत अशा प्रकारे एकटे राहणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या अनिश्‍चित वेळा असल्यामुळे लोक घरपोच जेवणाचा डबा मिळेल का अशा सर्व्हिसच्या शोधात असतात, त्यामुळे जेवणाचे डबे पुरवणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.

आपली नोकरी व व्यवसाय सांभाळून गृहोद्योग करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. स्वयंपाकाची आवड असणारे किंवा गृहिणी हा व्यवसाय यशस्वीपणे करू शकतात. कमीत कमी आर्थिक गुंतवणूक करून हा पूरक उद्योग सुरू करू शकतो. सुरुवातीला वेळेची गुंतवणूक व मनुष्यबळही कमी लागते. शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपांत मागणीनुसार तुम्ही सेवा देऊ शकता. कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची अट नाही, परंतु स्वयंपाक करण्याची आवड, अंगमेहनतीची तयारी आणि वेळेचे नियोजन या गोष्टी आवश्यक आहेत.

माहितीतल्या म्हणजेच शेजारी, नातेवाईक इत्यादींच्या ओळखीतून तुमच्या व्यवसायाला ग्राहक मिळवू शकता. जेवणाची चव आणि जेवणाची वेळ या दोन गोष्टी सांभाळल्या म्हणजे ग्राहकाचे समाधान होते आणि तो तुमचा खात्रीचा ग्राहक होतो. हळूहळू डब्यांची संख्या वाढवत, जेवणाची चव व जेवणाचा मेनू यात नावीन्य जपत तुम्ही व्यवसाय वाढवू शकता. सुरुवातीला डबे पोहोचविण्यासाठी एखादा गरजू मुलगाही हाताशी धरू शकता आणि हळूहळू व्यवसायात वाढ होईल तसे कर्मचारीही वाढवू शकता.

मराठीमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment