Tips For Glowing Skin In Marathi | तजेलदार त्वचेसाठी टिप्स । Health Tips In Marathi

तजेलदार त्वचेसाठी टिप्स | Tips For Glowing Skin In Marathi

  • त्वचेला नवजीवन देणारे ‘मसूर ‘

१. साबणाऐवजी मसूर आपण क्लिन्झर म्हणून वापरू शकतो .
२. हिरवे तसेच पिवळे मूगही वापरू शकतो लाल मसूरही उपयोगी पडतात .
३. हिरव्या मुगामध्ये ब आणि क जीवनसत्त्व असत . ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना मुरूम पुटकुळ्यांचा त्रास आहे त्यांच्यासाठी हिरव्या मुगाचा उपयोग फायदेशीर ठरतो .
४. हिरव्या मुगामधल्या प्रोटिन्समुळे त्वचेची नव्यानं बांधणी शक्य होते .
त्वचेखाली नव्या पेशी आणि ग्रंथी जीवंत होतात . यामुळे त्वचेलाही तेज येते .

  • ‘दूध ‘ नावाचं मॉईश्चरायझर

१. दूधात अ,ड आणि इ ही जीवनसत्व असतात . हे घटक त्वचेला मॉईश्चरायझर पुरवतात .
२. दूधातल्या प्रोटिन्समुळे त्वचेत ओलसरपणा राहतो .
३. काळवंडलेली त्वचा सुधारते .
४. तसेच दही ,जर्दाळूची पेस्ट ,केळ ,संत्री ,काकडी यांचा उपयोगही क्लिन्झर म्हणून करता येतो .

 नैसर्गिक क्लिन्झर:-

१. ओटसचा वापर नैसर्गिक क्लिन्झर म्हणून करता येतो .
२. ओटसमध्ये इ जीवनसत्व आणि झिंकचा मोठा संचय असतो .
३. ओटसमधील पॉलिसचेराइड्स या घटकांमुळे त्वचेवर पाण्याचा घटक असलेला ओलसर पडदा तयार होतो ,जो त्वचेचे उत्तम संरक्षण करतो .

मसूर ,ओट्स आणि नारळाचे तेल :-

मेकअप काढण्यासाठी काही क्लिन्झरचा वापर केला जातो . त्यासाठी नैसर्गिक क्लिन्झर चाच वापर करावा .

१. मसूरच किंवा ओट्स च पीठ थोडेसे नारळाचे तेल टाकून मिक्स करावे . हा लेप चेहर्याला आणि मानेला लावावा . हलक्या हाताने थोडावेळ चोळावा .नंतर चेहरा धुवून टाकावा .याने चेहऱ्यावरचा मेकअप निघून जातो आणि त्वचेच भरणपोषण होते .

मूग ,ओट्स आणि दूध:-

१. नैसर्गिक क्लिन्झर म्हणून हिरवे मूग आणि दुधाचाही वापर करता येतो .
२. हे क्लिन्झर तयार करताना २ चमचे हिरव्या मसुराचे पीठ ,२ चमचे ओट्स आणि थोडेसे दूध घ्यावे . यांचा लेप तयार करावा .

हा लेप हलक्या हाताने मसाज करत चेहरा आणि मानेला लावावा . ज्यांना पुटकुळ्यांचा त्रास आहे त्यांनी लेप चेहऱ्याला लावताना मसाज करू नये .
३. नंतर चेहरा आधी थोड्या कोमट दूधाने आणि नंतर थंड पाण्याने धुवावा .

पपई ,केळ ,स्ट्रॉबेरी:-

१. त्वचेसाठी अ,क आणि इ ही जीवनसत्व लागतात . त्यामुळे पपई हे फळ त्वचेला हे जीवनसत्वे देतात .
२. पपईमधला पापेन हा घटक त्वचा आणि पेशी पुनरुज्जीवित करण्यासाठी या घटकाचा उपयोग होतो.
३. ताज्या स्ट्रॉबेरीचा उपयोग त्वचेसाठी केल्यास त्वचा स्वछ होते .
४. चेहऱ्यावर केळाचा उपयोग केल्यास चेहऱ्यावर दिसणाऱ्या वयाच्या खुणा लपतात आणि त्वचाही लवचिक होते .

Leave a Comment

x