तेलकट त्वचेची काळजी
Tips For Oily Skin In Marathi
१. चेहरा नेहमी तेलकट असेल तर तो सुंदर वाटत नाही त्यामुळे तेलकट त्वचेची काळजी घ्यावी लागते .
२. तेलकटपणामुळे चेहऱ्यावर पुटकुळया सुद्धा येतात . याकरिता चेहऱ्याला क्लिन्झिंग लावावे .
३. तेलकट त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून २ वेळा चेहरा धुवून काढावा .
४. आठवडयातून कमीत कमी तीनदा चेह्ऱ्याला स्क्रब करावे . त्यामुळे चेहरा खुलून दिसेल .
५. त्वचेला टोनिंग करणे सुद्धा खूप आवश्यक आहे .
६. तिखट ,मसाल्याचे पदार्थ हे तेलकट त्वचेसाठी कमी केलेले बरे .
७. दुध किंवा दुधाचे पदार्थ हे तेलकट त्वचेसाठी जास्त वापरू नयेत .
८. वेखंड पावडर मध्ये पाणी मिक्स करून ते चेहऱ्याला लावावे.