तू गेल्यावर असे हरवले | Tu gelyawar ase harawale Marathi Lyrics

तू गेल्यावर असे हरवले | Tu gelyawar ase harawale Marathi Lyrics

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अरुण पौडवाल
स्वर- सुरेश वाडकर

तू गेल्यावर असे हरवले सूर.. हरवले गाणे
वेलीवरचे फूल ठिबकले, हळवे दर्द दिवाणे
शब्दांचा संभार आटला
गीतातुन अंधार दाटला
पाण्यावर थरथरले अवचित मार्दव अश्रु तराणे
पंखापरी फडफडल्या तारा
पानांतुन तडफडला वारा
इंद्रधनूचे रंग संपले, उरले गंध विराणे
हृदयाचे हुंकार कोपले
नयनांचे अभिसार लोपले
प्रीतीलतेच्या हरित व्यथेचे गहिवरले नजराणे

Leave a Comment