तुम्ही जाऊ नका हो रामा | Tumhi Jau Naka Ho Marathi Lyrics

तुम्ही जाऊ नका हो रामा | Tumhi Jau Naka Ho Marathi Lyrics

गीत -ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर – आशा भोसले ,  देवकी पंडित
चित्रपट-एक होता विदूषक


तुम्ही जाऊ नका हो रामा, जीव तुम्हांवर जडला
नका सोडू अधांतरी सुना तुम्हाविण बंगला

साजण रुसला ग धरिला अबोला
तुझ्या सावलीशी हिचा पाय गुंतलेला

कुंतीच्या गावची दु:ख भरली कथा
दाट वेणीत काळ्या फुले माळता
तुम्‍ही कट्यामुट्यांच्या वाटेवरी हो कसे भेटला

तुम्ही पाणकळा माझा भरला मळा
तुमच्या सावलीच्या अंगावरती झळा
लळा लावून जाता आता सांगू कुणाला हा मामला

Leave a Comment

x