तुम्ही माझे बाजीराव | Tumhi Maze Bajirao Marathi Lyrics

तुम्ही माझे बाजीराव | Tumhi Maze Bajirao Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – आशा भोसले
चित्रपट – वैजयंता
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – आशा भोसले
चित्रपट – वैजयंता


माझ्यासाठी दिली राहुटी, इतरांना मज्जाव
तुम्ही माझे बाजीराव

मी मस्तानी हिंदुस्तानी, बुंदेली पेहेराव
झिरझिरवाणी निळी ओढणी, वाळ्याचा शिडकाव

तुम्ही मराठे, नव्हे छाकटे, अगदी सरळ स्वभाव
शूर शिपाई तुमची द्वाही, चारी मुलखी नाव

उभी अंगलट तांबुस फिक्कट, नयनीं दाटला भाव
बोलावाचुन ख्यातीवाचुन, अर्जी आविर्भाव

काल दुपारी भरदरबारी, उरी लागला घाव
मी पण चळले, तुम्हा भाळले, आता नाही निभाव

दिठीदिठीचा नजरमिठीचा, हो‍ऊ द्याच सराव
या पायांशी मज दासीसी मिळेल का कधी वाव ?

Leave a Comment

x