उजळू स्मृती कशाला | Ujalu Smriti Kashala Marathi Lyrics

उजळू स्मृती कशाला | Ujalu Smriti Kashala Marathi Lyrics

गीत – वंदना विटणकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – आम्ही जातो अमुच्या गावा


उजळू स्मृती कशाला अश्रूंत दाटलेली ?
सांगू कशी कहाणी स्वप्‍नांत रंगलेली ?

आतूर लोचनांचे ते लाजरे बहाणे
मौनात साठलेले हितगूजही दिवाणे
नाती मनामनाची भाषेविनाच जुळली

ते फूल भावनेचे कोषांत आज सुकले
संगीत अंतरीचे ओठीं विरून गेले
हृदयास जाळणारी आता व्यथाच उरली

तू दाविलेस सखया मज चित्र नंदनाचे
उधळून तेच गेले संचित जीवनाचे
आता कुठे किनारा ? माझी दिशाच चुकली !

Leave a Comment

x