उमलली एक नवी भावना | Umalali Ek Navi Bhavana Marathi Lyrics

उमलली एक नवी भावना | Umalali Ek Navi Bhavana Marathi Lyrics

गीत – शांताराम आठवले
संगीत – वसंत पवार
स्वर – सुधीर फडके ,  सुमन कल्याणपूर
चित्रपट – सुभद्राहरण


उमलली एक नवी भावना !
नसे वेगळी सखे तुझ्याहुन माझी संवेदना !

अघटित गेले अवचित हो‍उन
विसरुनी गेले मी माझेपण
रेशीमधागे गुंतविणार्‍या प्रीतिच्या या खुणा !

वसुंधरेच्या कणाकणांतून
आकाशाच्या अणुरेणुतून
एक आगळी रसरसलेली प्रगटे नवचेतना !

हात असावे असेच हाती
अचल ध्रुवापरी अपुली प्रीती
मुक्ती नको मज प्रीतिसाठी जन्म पाहिजे पुन्हा !

Leave a Comment

x