उठ झाला प्रातःकाल | Uth Zala Pratahkal Marathi Lyrics

उठ झाला प्रातःकाल | Uth Zala Pratahkal Marathi Lyrics

गीत – शाहीर परशुराम
संगीत – वसंत पवार
स्वर – पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट – शाहीर परशुराम


उठ झाला प्रातःकाल, तुझे गोपाळ आले, वननिळा
पूर्व दिशे उदेला भानू, आला उदयाचळा

प्राणीमात्र पशू पक्षी, विश्रांत वृक्षी, अपुल्या स्थळी
निद्रा सारून जागृत होती पंच उषःकाळी

रावे मयूरे, संश साया, सुस्वर मुख कमळी
सद्भावे तुज ध्याती गाती स्वमुखे नामावळी

कनकाचे घट शिरी, यमुना तिरी, जाती जळा
पूर्व दिशे उदेला भानू, आला उदयाचळा

Leave a Comment