वादळाचा वेग घेउन | Vaadalacha Veg Gheun Marathi Lyrics
गीत – राम मोरे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – अपर्णा मयेकर
Vaadalacha Veg Gheun Marathi Lyrics
वादळाचा वेग घेउन चांदणे मी प्यायले
अन् सुखाचा साज सारा रोमरोमीं ल्यायले
लाजणार्या लोचनांची वीजवेडी पाखरे
स्पर्शितांना तू प्रिया रे, अंग माझे मोहरे
बहरलेल्या भावनांनी मी तुझ्याशी बोलले
चंदनाचा गंध दाटे भारलेल्या अंतरीं
पैंजणांच्या पाउलांनी रोज भिडले अंबरीं
वाकलेल्या या नभाने विश्व माझे व्यापिले
मी जगावे सर्वकाळी रेशमी नात्यांतुनी
गुंतला हा जीव आता या तुझ्या श्वासांतुनी
रे तुझ्या रूपांतुनी मी ईश्वराला पाहिले