वारा सुटे सुखाचा | Vaara Sute Sukhacha Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – आधार
वारा सुटे सुखाचा, आनंद मेघ आले
मी अमृतात न्हाले
अनिकेत त्यास लाभे सिंहासनी निवारा
नौकेस हात द्याया आला पुढे किनारा
कोमेजल्या लतेचा होऊन कुंज डोले
माझी मलाच कैसी झाले अनोळखी मी
तिन्ही जगात आता माझ्यापरी सुखी मी
हे भाग्य सोसवेना होतात नेत्र ओले
माझे मला कळेना आले घडून कैसे
उल्केस आज लाभे चैतन्य तारकेचे
उचलावया शिळा ती आभाळ नम्र झाले