वाट संपता संपेना | Vaat Sampata Sampena Marathi Lyrics

वाट संपता संपेना | Vaat Sampata Sampena Marathi Lyrics

गीत – देवकीनंदन सारस्वत
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – जयवंत कुलकर्णी


वाट संपता संपेना
कुणी वाटेत भेटेना
कुठे आलो असा कसा
कुणी काहीच सांगेना

लांबलांब उंच घाट
वाट वाकडीतोकडी
दूरदूर अंधारात
एक दिसते झोपडी
सूर येती, अंधारती
कुणी गीतही म्हणेना

दिसे प्रकाश अंधुक
नभी तार्‍यांचा कंदील
अंतर दोन मैलांचे
आता गाठीन मंझील
आकाशात रात्र फुले
चंद्र काहीच ऐकेना

Leave a Comment

x