मला आवडते वाट वळणाची | Vaat Valnachi Marathi Lyrics

मला आवडते वाट वळणाची | Vaat Valnachi Marathi Lyrics

गीत -आ. रा. देशपांडे ‘अनिल’
संगीत -आनंद मोडक
स्वर- अजय गोगावले


मला आवडते वाट वळणाची
दाट झाडीची नागमोडीची
ही अलीकडची नदिच्या थडीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
सरघसरणिची पायफसणिची
लवणावरची पानबसणिची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
अशि भुलवणिची हुलकावणिची
सागवेळुच्या भर रानींची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
जरा अडचणिची चढउतरणिची
घाटमाथ्याची ती पलीकडची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
इथची तिथची कधिं कुणिकडची
क्षितिजाकडची पुढची पुढची
मला आवडते वाट वळणाची

Leave a Comment