वैष्णवां घरीं सर्वकाळ | Vaishnava Ghari Sarvakaal Marathi Lyrics
रचना – संत नामदेव
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – पं. भीमसेन जोशी
Vaishnava Ghari Sarvakaal Marathi Lyrics
वैष्णवां घरीं सर्वकाळ ।
सदा झणझणिती टाळ ॥१॥
कण्या भाकरीचें खाणें ।
गांठीं रामनाम नाणें ॥२॥
बैसावयासी कांबळा ।
द्वारीं तुळसी रंगमाळा ॥३॥
घरीं दुभे कामधेनु ।
तुपावरी तुळसी पानु ॥४॥
फराळासी पीठ लाह्या ।
घडीघडी पडती पायां ॥५॥
नामा ह्मणे नेणती कांहीं ।
चित्त अखंड विठ्ठलपायीं ॥६॥