वाजवी पावा गोविंद | Vajavi Paava Govind Marathi Lyrics

वाजवी पावा गोविंद | Vajavi Paava Govind Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – माणिक वर्मा


शरदाचे चांदणे, मधुवनी, फुलला निशिगंध
नाचतो गोपीजनवृंद, वाजवी पावा गोविंद !

पैंजणे रुणझुणती, मेखला कटिवर किणकिणती
वाहते यमुनाजळ धुंद, वाजवी पावा गोविंद !

वारा झुळझुळतो, फुलांचा सुगंध दरवळतो
सांडतो भरुनी आनंद, वाजवी पावा गोविंद !

धरुनिया फेर हरीभवती, गोजिर्‍या गोपी गुणगुणती
आगळा रासांचा छंद, वाजवी पावा गोविंद !

Leave a Comment