वाकल्या दिशा फुलून | Vaklya Disha Phulun Marathi Lyrics

वाकल्या दिशा फुलून | Vaklya Disha Phulun Marathi Lyrics

गीत – ग्रेस
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – अरुण दाते


Vaklya Disha Phulun Marathi Lyrics

वाकल्या दिशा फुलून स्‍निग्ध रंग सावळा,
या फुलांत या सुरांत चंद्र घालतो गळा

पावलें अशीं सलील नादती कुठून नाद ?
मी क्षितिज वाहतों तरी जुळे न शब्द, गीत.

दु:ख एक पांगळें जशी तरूंत सावली
या उरांत पेटलीस, कां उन्हास काहिली ?

असे कसें सुनें सुनें मला उदास वाटतें
जशी उडून पांखरें नभांत चाललीं कुठें ?

Leave a Comment

x