वळते वाट चढता घाट | Valate Vaat Chadhata Ghaat Marathi Lyrics

वळते वाट चढता घाट | Valate Vaat Chadhata Ghaat Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – उमज पडेल तर


वळते वाट चढता घाट
तोल सावरा अंगाचा
वसंत आला वनात बाई, उत्सव चाले रंगाचा !

बाई जपून जा गडे जपून जा
जपून जा बाई जपून जा !

हा चैत्र प्रीतिचा महिना
तरुतरूंत गाती मैना
खगाखगांचा सूर लागतो आज वेगळ्या ढंगांचा !

वनलतांत घुमती वाळे
त्या तिथेच मन्मथ खेळे
तळ्यात फुलल्या कमळांभवती संघ गुणगुणे भृगांचा !

भिरभिरून वारा येतो
अन्‌ पदरा उडवुन देतो
वातावरणी थवा तरंगे सप्‍तरंगि त्या मेघांचा !

Leave a Comment