वेदमंत्राहून आम्हां | Vedamantrahun Amha Marathi Lyrics

वेदमंत्राहून आम्हां | Vedamantrahun Amha Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – वंदे मातरम्‌


वेदमंत्राहून आम्हां वंन्‍द्य ‘वन्‍दे मातरम्‌’
वंद्य वंदे मातरम्‌

माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारतीं
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र ‘वन्‍दे मातरम्’

याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्‍त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले
शस्‍त्रहीनां एक लाभे शस्‍त्र ‘वन्‍दे मातरम्’

निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकीं जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत ‘वन्‍दे मातरम्‌’!

Leave a Comment

x