विठ्ठलाच्या पायी थरारली | Vitthlachya Payi Thararali Marathi Lyrics

विठ्ठलाच्या पायी थरारली | Vitthlachya Payi Thararali Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – राम कदम
स्वर – पं. भीमसेन जोशी
चित्रपट – देवकीनंदन गोपाला


Vitthlachya Payi Thararali Marathi Lyrics

विठ्ठलाच्या पायीं थरारली वीट
राउळींची घांट निनादली

उठला हुंदका देहूच्या वार्‍यांत
तुका समाधीत चाळवला

अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव
निघाला वैष्णव वैकुंठासी

संत-माळेंतील मणी शेवटला
आज ओघळला, एकाएकीं

Leave a Comment

x