वृक्ष नष्ट झाले तर मराठी निबंध | Vruksh Nasht Zale Tar Marathi Nibandh

Vruksh Nasht Zale Tar Marathi Nibandh | वृक्ष नष्ट झाले तर मराठी निबंध 2024

Vruksh Nasht Zale Tar Marathi Nibandh: मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वृक्ष नष्ट झाले तर मराठी निबंध. तर चला मग आजच्या लेखाला सुरवात करूया.

वृक्षाचे नाव एकताच, एकच गाणे आठवते व ते म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहले आहे. निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहेत. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. पण आजच्या या २१व्या शतकात संपूर्ण जगात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत. ज्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसायला लागले आहेत. आज सर्व आपल्या आजूबाजूचा प्रदेश, डोंगर, जंगल हे वृक्ष नष्ट झाल्याने ओसाड पडत चालले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता नष्ट झाली आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही आहे आणि या मुळेच सृष्टीचे वैभव संकटात पडत चालले आहे.

पाऊस कमी पडल्यामुळे पाणी टंचाईची खूप मोठी समस्या तीव्रतेने जाणवत आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड़ झाल्यामुळे व नवीन वृक्षांचा लागवड न झाल्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. शहरात रस्ते दुरूस्ती, रस्तेरुंदी, उंच-उंच इमारतीचे बांधकाम करण्या करता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, ज्यामुळे उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

देशात कित्येक ठिकाणी तापमान ४५° C पेक्षा अधिक पोहचला आहे. म्हणून विकासाच्या योजना आखताना व शहरीकरण करताना मूलभूत सुविधांकडे, पर्यावरण रक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

Vruksh Nast Zale marathi essay
Vruksh Nast Zale marathi essay

जंगल तोडी मुळे जंगलातील प्राणीही बेघर होत आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये भक्ष व आसरा शोधत आहेत. आणि यामुळे जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. हे थांबवण्याकरिता नागरीकांत वृक्षतोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे. जंगलाची उपयुक्तता व वृक्षारोपणाचे फायदे यांची माहिती नागरिकात पोहचवलीत पाहिजे.

हे देखील वाचा: Eka Pustakachi Atmakatha Marathi Nibandh

झाडांशिवाय या पृथ्वीतलावर आपले जीवन शक्य नाही, झाडांशिवाय आपल्याला अन्न मिळणार नाही, पाणीच्या कमतरता भासायला लागेल, श्वास घेण्यासाठी प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन मिळणार नाही. आणि झाडांशिवाय वातावरणात वारा वाहणार नाही. संपूर्ण जमिनीवर फक्त दगडेच दगडे असतील, सर्व भाग वाळवंट होऊन जाईल.

Vruksh Nasht Zale Tar Marathi Nibandh
Vruksh Nasht Zale Tar Marathi Nibandh

झाडांशिवाय जीवन शक्य नाही, झाडे असतील तर जीवन आहे. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. झाडे नसतील तर पूर्ण पृथ्वीचा नाश होऊन जाईल म्हणून वेळोवेळी झाडे तोडणाऱ्यांचा विरोध केला पाहिजे. वुक्ष तोडीला जवाबदार ठरणारा मनुष्यच हे सर्व थांबवून सृष्टीला थांबवू शकतो.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा वृक्ष नष्ट झाले तर(Vruksh Nasht Zale Tar Marathi Nibandh) आवडला असेल. जर तुमच्या कडे सुद्धा Vruksh Nasht Zale Tar Marathi Niband वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा वृक्ष नष्ट झाले तर वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. मित्रांनो तुम्हाला जर का असेल मराठी निबंध वाचायचे असतील तर तुम्ही आमचा अँप देखील डाउनलोड करू शकता.

हे देखील वाचा

Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh

मराठी निबंध अँप

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

19 thoughts on “वृक्ष नष्ट झाले तर मराठी निबंध | Vruksh Nasht Zale Tar Marathi Nibandh”

  1. Thanks you help me in doing my assignment of Marathi .
    Your essay help me
    Once again thanks a lot.
    I like this essay toooo much

    Reply

Leave a Comment