डुक्कर मानवी विष्ठा का खातात? जर आपण अगोदरच त्या अन्नातून ऊर्जा काढून घेतो तर त्याच अन्नाच्या विष्ठेतून त्यांना ऊर्जा कशी मिळते?

संपूर्ण सृष्टी मधे हे आढळुन येते. तुम्ही शेण किडा पाहिला असेलच, पाळीव पशूचा वावर असलेली ठिकाणे व जंगले, दोन्ही कडे हे किडे असतात. ते विशेष करून शाकाहारी पशुंच्या विष्ठेचं रीसाइक्लिंग करतात. शाकाहार व विषेशत: गवत पचनाकरता कठीण असते , त्या मुळे शाकाहारी प्राण्यांच्या विष्ठेद्वारे न पचलेल्या किंवा अर्धवट पचलेल्या अवस्थेत बाहेर फेकलं जाते. आपण जंगली हत्ती चे ऊदाहरन घेऊयात, हत्ती दिवसाला सरासरी १४० किलो वनस्पती खातो. यात गवत, झाडांचा पाला, साल व मुळासकट उपटलेल्या काटेरी वनस्पती यांचा समावेश असतो. हे पचायला जड असल्याने हत्तीला खूप खावे लागते. हत्ती विष्ठा टाकतो तेव्हा त्यात भरपूर प्रमाणात अर्धवट पचलेल्या अवस्थेत पोषक पदार्थ असतात. शेणकिडा या विष्ठेचे आपल्या आकारा पेक्षा मोठे गोळे करून जमिनीत खोलवर खोदलेल्या बिळात ढकलत नेतो व त्या गोळ्यात आपली अंडी टाकतो.अंड्यां मधुन पिल्ले बाहेर आल्यावर हत्ती च्या विष्ठेतील पोषक तत्व खावून मोठे होतात व ऊरलेला भाग जमिनीत वनस्पती च्या मुळांना ऊपलब्ध होतो. म्हणजे शेणकीडा जमिनीची सुपीकता वाढवतो, जमिन भुसभुशीत ठेवतो.

येथे अतिशय खेदाने नमुद करावं लागेल कि आपल्या कृषी वैज्ञानिकांनी व शेतकऱ्यांनी वेळीच शेणकीड्याचं महत्व लक्षात घेतलं नाही.रासायनिक खते, विषारी किटक नाशकं यांच्या वापरा मुळे शेत शिवारातून शेणकिडा नष्ट होण्याच्या मार्गा वर आहे. परिणामी शेतांमधे पडलेलं शेण तसच पडून असते व वाळुन गोवरी बनते आहे, जमिन कडक पडत आहे. असो.

वरील विवेचना कदाचित विषयांतर वाटेल, परंतू विषय निसर्ग काम कसं करतो हे समजून घेणे आवश्यक आहे. येथे अजुन एक लक्षात घ्यायला हवं कि प्रत्येक प्रजातीची पचन शक्ति वेगवेगळी असते. आपण वर पाहीलं कि हत्ती ची पचन शक्ति कमी असते तर त्या उलट तडस (hyena/लकडबग्गा) ची पचन शक्ति इतकी जबरदस्त असते कि ते सडलेले मांस व हाडं सुद्धा पचवू शकते. जंगलात पशुंना कैलशियम ची कमतरता जाणवली तर ते तडसाची विष्ठा खातात.

तात्पर्य हे कि मानवच काय इतर प्राण्यांच्या विष्ठेत सुद्धा काही पोषक तत्व शिल्लक असतात जी इतर प्राणी व वनस्पतिंच्या उपयोगात येतात. तसं जर नसतं तर शेतकरी पशुंच्या मल-मुत्राचा उपयोग शेतात खत म्हणून का करतील?

अजुन एक गैर समज जो बहुसंख्य लोकांचा असतो, तो हा कि विष्ठा म्हणजे फक्त न पचलेल अन्न. तसं नसते, विष्ठे द्वारे आपल्या शरीराच्या चयापचयाने निर्माण झालेले, आपल्या शरीरात नको असलेले पदार्थ सुद्धा विसर्जित केले जातात. मानव मुळातच खुप सकस व त्या कारणाने कमी खाणारा प्राणी आहे, या कारणाने मानवी विष्ठेत डुक्करां करता भरपूर ऊर्जा व पोषक तत्व असतात, म्हणजे ते त्यांच्या करता अन्न आहे. हे निसर्ग चक्र आहे, त्यात किळस किंवावा नवल वाटण्यासारखे काहिही नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *