इंटरनेट कुकीज म्हणजे काय? | What internet cookies in Marathi

इंटरनेट कुकीज म्हणजे काय? | What internet cookies in Marathi

इंटरनेट विश्वात आपण काय करतो आणि कोणत्या पेजवर जास्त वेळा जातो याची नोंद ठेवणे इंटरनेट कुकीज मुळेच शक्य होते. कुकीज हा तसा इंग्रजी शब्द बिस्कीट साठी वापरला जातो मात्र खर तर इंटरनेट विश्वात कुकीज ही संज्ञा आपल्या सवयी साठवून ठेवणाऱ्या फाईल साठी वापरली जाते.

कुकीज च्या माध्यमातून आपली आवड आणि वेब ब्राउझिंग ची सवय यांच्याबद्दल माहिती संगणकावर किंवा मोबाईल वर साठवून ठेवली जाते. जेव्हा कधी आपण पुन्हा त्याच वेबसाईटला भेट देतो तेव्हा आपली आवड ही कुकीज मधून त्या वेबसाईटला ब्राउझर द्वारे पाठवतात आणि त्यामुळे आपली ब्राउझिंग अधिकाधिक सुखकर होते.

इंटरनेट कुकीज म्हणजे काय? । Internet cookies meaning in Marathi

तुम्ही ज्या कोणत्याही वेबसाईटला भेट देतात तेव्हा तुमची ब्राउझिंग आणि तुमची आवड साठवून ठेवणारी कंप्युटर किंवा मोबाईल ब्राउझर मधील एक टेक्नॉलॉजी म्हणजे इंटरनेट कुकीज होय.

इंटरनेट कुकीज ही संकल्पना देखील खूप महत्वाची आहे कारण याच्या माध्यमातून तुमचा त्या वेबसाईट वर दुसऱ्यांदा गेल्यानंतरचा अनुभव चांगला बनतो. तुमच्या समोर यामुळे वेबसाईट जलद गतीने लाँच व्हायला सुरुवात होते. इंटरनेट कुकीज या फाईल ची क्षमता तितकी जास्त नसते. त्यामुळे ब्राउझर मध्ये देखील खूप कमी प्रमाणात इंटरनेट कुकीज जागा घेत असतात.

इंटरनेट कुकीज काम कशा करतात?

इंटरनेट कुकीज या खालीलप्रमाणे काम करत असतात,

  1. वापरकर्ता जेव्हा मोबाईल किंवा संगणकावरून एखाद्या वेबसाईटला भेट देतो तेव्हा त्या वेबसाईटने कुकीज ही सेटिंग ऑन करून ठेवलेली असेल तर त्या वापरकर्त्याच्या संगणकात किंवा मोबाईल सारख्या उपकरणात वेबसाईट कडून कुकीज पाठविल्या जातात.
  2. ब्राउझर(Chrome किंव्हा Firefox) मध्ये कुकीज या भागात ही सर्व माहिती साठविली जाते.
  3. कुकीज फोल्डर ची साईज खूप छोटी असते. त्यामुळे याचा ब्राउझर वर जास्त ताण पडत नाही.
  4. आपण पुन्हा कधीही त्याच वेबसाईट ला परत भेट दिली असता ब्राउझर कडून ही कुकीज वेबसाईटला पाठविली जाते.
  5. आपल्या बद्दल आधीच्या भेटीची जी काही माहिती असेल ती आता पुढच्या भेटीत वेबसाईट वेगाने लोड करणे, आवडी साठवून ठेवणे यासाठी वापरली जाते.
What internet cookies in Marathi
What internet cookies in Marathi

 

इंटरनेट कुकीज चे प्रकार

कुकीज चे त्याच्या साठवण क्षमतेनुसार 2 वेगवेगळे प्रकार पडतात. याचा संबंध आपण थोडासा संगणकाच्या मेमरी सोबत लावू शकतो.

  1. सेशन कुकीज – सेशन कुकीज या ब्राउझर मध्ये साठविलेल्या असतात. मात्र जसे आपण ब्राउझर बंद करतो तसे लगेचच वेबसाईट बंद झाल्यावर या कुकीज नष्ट होऊन जातात. म्हणजेच काही सेशन साठी तयार होऊन ब्राउझर मध्ये साठवून ठेवल्या जाणाऱ्या कुकीज या सेशन कुकीज असतात.
  2. स्थायी कुकीज – आपण वेबसाईट बंद केल्यानंतर देखील आणि ब्राउझर देखील बंद केले असेल तरी 28 दिवस किंवा वेबसाईटने ठरविलेल्या काळानुसार संगणकावर किंवा मोबाईलवर साठविलेल्या जाणाऱ्या कुकिजला स्थायी कुकीज म्हणून ओळखतात. मुख्यतः शॉपिंग वेबसाईट वर तुमचा अनुभव चांगला रहावा यासाठी स्थायी कुकिजचा वापर केला जातो.

इंटरनेट कुकिजचे फायदे

  • कुकीज वर वेबसाईट तुम्हाला काय देणार आहे हे जास्तीत जास्त अवलंबून असते. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या वेबसाईट वर चांगला अनुभव मिळत असेल तर त्याचे कारण कुकीज असतात. तुमची आवड आणि वेब ब्राउझिंग विषयी कुकीज माहिती साठवतात आणि नंतर ब्राउझर कडून वेबसाईटला देतात देखील.
  • कुकीज मुळे आपल्याला एखाद्या वेबसाईटवर पुन्हा पुन्हा लॉगिन करावे लागत नाही. लॉगिन विषयी माहिती कुकीज मधून साठवून ठेवली जाते. अनेकदा आपण फेसबुक लॉगिन करत असताना कुकीज बंद झाल्या आहेत असा एरर बघतो. त्याचा संबंध याच इंटरनेट कुकीज सोबत आहे.
  • कुकीज च्या माध्यमातून आपण कोणत्या वेबसाईटवर आहोत आणि त्यातील कोणत्या पेज वर जास्त वेळ घालवत आहोत ही माहित समजते. त्यामुळे वेबसाईटच्या मालकास वेबसाईट विषयी विश्लेषण करत असताना फायदा नक्की होतो.

इंटरनेट कुकीजचे नुकसान

आपल्याला इंटरनेट कुकीजचा जसा फायदा होतो त्याच सोबत याचे नुकसान देखील खूप आहेत.

  • आज आपल्याला आपल्या समोर ज्या काही जाहिराती दिसतात याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे इंटरनेट कुकीज होय. इंटरनेट कुकीज मुळे आपली प्रायव्हसी अर्थात गोपनीयता धोक्यात आलेली आहे.
  • आपल्या कुकीज फाईल जर एखाद्या हॅकर च्या ताब्यात गेल्यास त्यातून तो आपली लॉगिन केलेली माहिती चोरून आपल्या खात्यात सहजासहजी प्रवेश करू शकतो.

FAQ

Q . कुकीज चे फायदे काय आहेत?

आपली ब्राउझिंग आणि वेबसाईट वरील अनुभव अधिकाधिक सोप्पा बनविण्यासाठी कुकीज चा फायदा होतो.

Q . कुकिजमुळे काय नुकसान होऊ शकते?

कुकीज मुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येते आणि त्याचाच फायदा हॅकर्स घेऊन तुमचे खाते सहज हॅक करू शकतात.

Q . कुकीज ब्लॉक करणे योग्य आहे का?

काही वेबसाईट या कुकीज ब्लॉक केल्यास चालूच शकत नाही. त्यामुळे कुकीज पूर्णपणे ब्लॉक करणे योग्य नाही.

निष्कर्ष | Conclusion

कुकीज मुळे आपल्याला फायदा तर होतो आहे मात्र त्याचे नुकसान काय आहेत हे जाणून घेऊनच आपण त्या चालू बंद करायला हव्यात. आपल्या कुकीज चालू असतील तर वेळेनुसार त्या क्लिअर करणे देखील गरजेचे असते. आपल्या ब्राउझर मध्ये जाऊन कोणते ॲप कुकीज वापरत आहे हे जाणून घेणे फार गरजेचे आहे.

तर मित्रांनो तुम्हाला आता इंटरनेट कुकीज बद्दल संपूर्ण माहिती समजली असेल, तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की विचारा.

हे देखील वाचा

चॅट करताना वापरा या स्पेशल टिप्स

Leave a Comment