4K रिझोल्यूशन म्हणजे काय | What is 4K technology in Marathi

4K रिझोल्यूशन म्हणजे काय | What is 4K technology in Marathi

घरातील टेलिव्हिजन सेट पासून ते मोबाईलच्या डिस्प्ले पर्यंत सर्व काही कसं सुंदर दिसायला हवं. त्यासाठी आपण प्रत्येक वेळी नवीन आणि प्रगत असं काहितरी तंत्रज्ञान शोधत असतो. त्यापैकी एक टेक्नॉलॉजी म्हणजे 4K टेक्नॉलॉजी.

4k हे स्क्रीन मधील एक प्रगत तंत्रज्ञान असून आज प्रत्येक स्क्रीन ही 4k किंवा अगदी त्याहून अधिक क्वालिटी ची असावी असे प्रत्येकाला वाटत. मार्केट मध्ये अगदी साध्या ब्लॅक अँड व्हाईट डिस्प्ले पासून होणारी सुरुवात आज 8k आणि 10k टेक्नॉलॉजी पेक्षाही पुढे गेली आहे. चला तर मग आज 4k टेक्नॉलॉजी नक्की काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

4K टेक्नॉलॉजी काय आहे?

समोर आलेल्या चित्रात किंवा व्हिडिओ मध्ये पिक्सेल किती आहेत याची संख्या म्हणजे रिजोल्युशन होय. स्क्रीन वर जितके पिक्सेल असतील तितकं त्या स्क्रीनचे रिजोल्युशन असते.

4k रिजोल्युशन म्हणजे काय तर समोर दिसणाऱ्या स्क्रीन वर साधारणतः एकूण 3840 म्हणजेच जवळपास 4 हजार पिक्सेल आडव्या रेषेत असतात. 4k रिजोल्युशन असलेला डिस्प्ले हा 3840X2160 पिक्सेल मिळून बनलेला असतो.

4K टेक्नॉलॉजी चे फायदे

  • स्क्रीन वर पिक्सेल ची संख्या अधिकाधिक असल्याने 4K टेक्नॉलॉजी वापरलेल्या स्क्रीन वर चित्र अधिकाधिक सुंदर दिसते. चित्रात पिक्सेल स्पष्ट येत असल्याने सूक्ष्म गोष्टी देखील चांगल्या प्रकारे बघता येतात.
  • एक छोटा पिक्सेल जास्तीत जास्त डिटेल्स दाखवत असल्याने ते जास्त प्रखर दिसते. यातून चित्राची रंगसंगती आणि स्पष्टता दिसून येते.
  • 4k टेक्नॉलॉजी मध्ये गडद दिसणारे रंग अधिकाधिक गडद आणि इतर पांढरे रंग हे सफेद दिसतात.
  • 4k टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून जर रियालिटी डिस्प्ले दाखविला जात असेल तर त्यात अधिकाधिक जिवंतपणा दाखविता येतो.

4k टेक्नॉलॉजी चे विविध प्रकार

What is 4K technology in Marathi
What is 4K technology in Marathi

 

4k टेक्नॉलॉजी विविध प्रकारात विभागली गेली आहे. 4k या टेक्नॉलॉजी मध्ये देखील वापरलेल्या तंत्रज्ञान अनुसार विविध प्रकार बनविलेले आहेत.

  • Cinema 4K : चित्रपटात आणि आपल्या टेलिव्हिजन वर जो स्क्रीन प्रकार वापरला जातो त्याला 4k Cinema म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे दाखविले जाणारे दृश्य देखील Cinema 4K प्रकारच्या कॅमेरा मधून चित्रित केले जाते.
  • Digital Cinema Initiatives (DCI) 4k : सिनेमा घरांमध्ये रेकॉर्डिंग आणि डिस्प्ले साठी सिनेमा 4k पेक्षा अधिक प्रगत टेक्नॉलॉजी म्हणून DCI वापरली जाते. सिनेमा घरात वापरला जाणारा हा 4K मधील सर्वात प्रगत स्टँडर्ड आहे.
  • Ultra HD : घरघुती उपकरणे अर्थात लॅपटॉप आणि टेलिव्हिजन वर आपल्याला ही मानक प्राप्त असलेली 4K टेक्नॉलॉजी वापरलेली दिसते.

4K टेक्नॉलॉजी वर आधारित उपकरणे

  • नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आज मार्केट मध्ये 4k टेलिव्हिजन उपलब्ध झालेले आहे.
  • मोबाईल उपकरणांमध्ये आता 4k व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.
  • मोबाईल च्या माध्यमातून आपण 4k व्हिडिओ बघू शकतो.
  • कॅमेरा मध्ये देखील आता 4k कॅमेरा उपलब्ध आहेत.
  • PS 5 सारखे व्हिडिओ गेम प्लॅटफॉर्म आणि कंप्युटर स्क्रीन किंवा लॅपटॉप मध्ये देखील 4K स्क्रीन उपलब्ध आहेत.

4k टेक्नॉलॉजी विषयी

अनेकदा आपण आपल्या घरातील टेलिव्हिजन साठी किंवा आपल्या मोबाईल साठी प्रगत तंत्रज्ञान निवडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ते तंत्रज्ञान तुमच्यासाठी खरंच गरजेचं आहे का? याचा विचार करणे फार गरजेचे असते. त्यामुळे 4k टेक्नॉलॉजी निवडत असताना काय गोष्टींची काळजी घ्यावी हे नक्की वाचा.

4k टेक्नॉलॉजी असलेला टेलिव्हिजन घेणे म्हणजे सर्वस्व नाही. तुमच्या टिव्ही चा आकार जर छोटा असेल आणि त्यात तुम्ही 4k टेक्नॉलॉजी साठी हट्ट करत असाल तर त्याचा काही एक फायदा होणार नाही. छोट्या आकारात खूप जास्त पिक्सेल असतील तर ते अधिक वाईट दिसते. त्यामुळे त्या पिक्सलसाठी योग्य जागा मिळाली तर त्या 4k डिस्प्ले चा फायदा होणार आहे.

4k टेलिव्हिजन घेऊन तुम्हाला 4k अनुभव मिळणार नाही. 4k कनेक्टिव्हिटी सपोर्ट देखील यासाठी हवा असतो. म्हणजे जर तुमच्याकडे असलेले सेटअप बॉक्स किंवा गेमिंग कंसोल जर 4k सपोर्ट करत नसेल तर त्याला 4k टेलिव्हिजन सोबत जोडणी करून काही फायदा नाही. तुमच्याकडे येणाऱ्या OTT प्लॅटफॉर्म चे 4K सबस्क्रिप्शन नसेल तर त्याचा फायदा नाही.

FAQ

Q . 4K टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय?

A. स्क्रीन वरील चित्रात 3840X2160 पिक्सेल असतील तर त्या डिस्प्ले ला 4k रिजोल्युशन टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जाते.

Q . 4k टेक्नॉलॉजी ला Ultra HD म्हणून का ओळखले जाते?

A. 4k टेक्नॉलॉजी मधील रिजोल्युशन हे HD रिजोल्युशन पेक्षा 4 वेळा जास्त असते आणि त्यामुळे याला Ultra HD म्हणून ओळखले जाते.

निष्कर्ष

प्रगती पथावर असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रात वेळेनुसार अनेक बदल होत आहेत. या बदलांमधील हे 4k रिजोल्युशन तंत्रज्ञान हे एक मोठं पाऊल होत. आज 4k पेक्षा ही अधिकाधिक रिजोल्युशन निर्माण झाले आहेत मात्र सामान्य जनतेला बजेट मध्ये आणि योग्य असे तंत्रज्ञान म्हणजे 4k टेक्नॉलॉजी होय.

आज आपण 4k टेक्नॉलॉजी काय आहे, त्याचे फायदे आणि नुकसान आणि विविध प्रकार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

Leave a Comment