Gorilla Glass म्हणजे काय? | What is Gorilla Glass In Marathi?
अनेकदा आपल्याला आपल्या मोबाईल वर प्रोटेक्शन साठी एखादी ग्लास लावावी असे वाटत असते. मात्र आपल्या मोबाईल मध्ये अनेक दिवसांपासून एक चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन आधी पासूनच दिले जात आहे. तुम्हाला या विषयी माहिती आहे का?
मित्रांनो जंगलात राहणाऱ्या गोरिला प्राण्या प्रमाणे भक्कम अशा प्रोटेक्शन काचेला गोरिला ग्लास म्हणतात. फक्त मोबाईलचं नव्हे तर टॅबलेट, कंप्युटर किंवा जिथे कुठे कठीण काचेची गरज आहे अशा सर्व ठिकाणी गोरिला ग्लास चा वापर केला जातो. चला आज याच गोरिला ग्लास विषयी जाणून घेऊयात.
Gorilla Glass म्हणजे काय?
गोरिला ग्लास हे तंत्रज्ञान कॉर्निंग गोरिला ग्लास म्हणून ओळखलं जातं. एका कंपनीने हे नवीन प्रकारे विकसित केलेले आवरण आहे. याचा फायदा त्या काचेला मजबुती देण्यात येतो.
गोरिला ग्लास हे तंत्रज्ञान मोबाईल, टॅबलेट, स्मार्ट वॉच, लॅपटॉप सारख्या सर्व ठिकाणी वापरले जाते. कुठल्याही प्रकारे फुटणे किंवा खरचटने यापासून कॉर्नींग गोरिला ग्लास त्या उपकरणाला सुरक्षितता देते.
अनेक रासायनिक क्रिया करून खूप छोट्या आकाराच्या ग्लास मध्ये जास्तीत जात मजबुती आणली जाते. ही प्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी देखील यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्या सर्वात वरच्या स्तराला खूप जास्त कठीण बनवले जाते.
Gorilla Glass चे प्रकार
2008 मध्ये सुरुवात झालेल्या कॉर्णिग गोरिला ग्लास मध्ये वेळेनुसार अनेक बदल होत गेले.
- 2008 मध्ये गोरिला ग्लास 1 नावाने सर्वात पाहिले संस्करण लाँच झाले.
- 2012 मध्ये कंपनीने याचे दुसरे संस्करण लाँच केले. पहिल्या वर्जन पेक्षा याची जाडी 20% ने कमी होती.
- 2013 मध्ये सूक्ष्म कणांनी बनलेले सर्वात जास्त मजबूत असे संस्करण लाँच करण्यात आले.
- 2014 मध्ये गोरिला ग्लास 4 लाँच करण्यात आला. यामध्ये जवळपास 80% प्रोटेक्शन वाढविण्यात आणि जाडी कमी करण्यात आली.
- 2016 मध्ये2 मीटर उंचीवरून मोबाईल फेकून देखील 100% सुरक्षितता मोबईलाला मिळाली.
- 2018 मध्ये गोरिला ग्लास 6 सुरू करण्यात आले. आज पर्यंतची ती सर्वात सुरक्षित काच होती. मात्र पुढे यात आणखी सुधारणा झाल्या.
- 2020 मध्ये कोर्निग गोरिला ग्लास विक्टस सुरू झाले. यामध्ये अल्युमिनोसिलीकेत वापरून जाडी कमी करण्यात आली होती.
Corning Gorilla Glass चे फायदे
- कोर्निंग गोरिला ग्लास वापरलेले उपकरण हे जास्तीत जास्त टिकाऊ बनते. कारण यावर तुम्ही कितीही खरचटले तरी देखील त्याचा परिणाम ग्लास वर होणार नाही.
- गोरिला ग्लास वापरलेल्या उपकरणांमध्ये डिस्प्ले क्वालिटी म्हणजेच स्पष्टता ही चांगली असते. अनेकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा गोरिला ग्लास आली तेव्हा कदाचित डिस्प्ले थोडा खराब झाला होता मात्र पुढे त्यात सुधारणा करून अगदी स्पष्ट डिस्प्ले गुणवत्ता गोरिला ग्लास देऊ शकले.
- गोरिला ग्लास ही इतकी जास्त मजबूत असते तर त्याचा परिणाम हा टच स्क्रीन वर होऊ शकत होता. मात्र तसे मुळीच झाले नाही. आपण सामान्य प्रकारे जसे टच स्क्रीन वापरतो अगदी तसेच तुम्हाला गोरिला ग्लास असताना वापरता येते.
- गोरिला ग्लास हा कमी जाड असल्याने त्याचा परिणाम मोबाईल जाडी वाढविण्यात कुठेही होत नाही.
- गोरिला ग्लास ही काच सर्वाधिक उष्णता सहन करणारी काच आहे. मोबाईल मध्ये कितीही जास्त प्रमाणात उष्णता निर्माण झाली तरी देखील त्याचा परिणाम गोरिला ग्लास वर दिसत नाही.
- गोरिला ग्लास लावल्यानंतर मोबाईल वर कोणतीही प्रोटेक्शन ग्लास लावण्याची गरज नसते. त्यामुळे अनेकदा जर तुमच्या मनात प्रश्न असेल की गोरिला ग्लास तुटते तर तसे घडत नाही.
Gorilla Glass चे नुकसान
- गोरिला ग्लास ची किंमत ही थोडी जास्त असल्याने मोबाईलची किंमत वाढते.
- गोरिला ग्लास ची हार्डनेस क्षमता ही5 पर्यंत असते. त्यामुळे या पेक्षा अधिक बल त्यावर पडले तर मोबाईल स्क्रीन फुटते किंवा त्यावर खरचटले जाते.
- गोरिला ग्लास खूप कमी जाड जरी असेल तरी देखील गोरिला ग्लास ने मोबाईल ची जाडी थोडी जास्त वाढते.
Gorilla Glass आणि टेंपर्ड ग्लास मधील फरक
Gorilla Glass | Tempered Glass |
1. गोरिला ग्लास ची किंमत ही खूप जास्त असते. मात्र यातून मिळणारी सुरक्षितता देखील तितकी जास्त असते. | 1. टेंपर्ड ग्लास हे खूप स्वस्त असतात. मार्केट मध्ये सहज उपलब्ध असतात. मात्र गोरिला ग्लास इतके प्रोटेक्शन देऊ शकत नाही. |
2. गोरिला ग्लास सहज वापरता येते. उष्णतेचे त्यावर काहीही परिणाम होत नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मोबाईल किंवा ते उपकरण सहज वापरता येते. | 2. टेंपर्ड ग्लास हा फक्त संरक्षण साठी असते. यातून तुम्हाला जास्तीत जास्त उष्णता निर्माण झाल्यानंतर मात्र काही संरक्षण उपलब्ध नसते. |
FAQ
Q. गोरिला ग्लास चे प्रकार कोणते आहे?
गोरिला ग्लास चे अनेक प्रकार आहेत. त्यात ग्लास 1 पासून ते ग्लास 6 पर्यंत आणि पुढे कॉर्णींग गोरिला ग्लास विक्ट्स हा एक प्रकार आहे.
Q. गोरिला ग्लास मध्ये हार्डनेस स्केल काय असते?
गोरिला ग्लास मध्ये Mohs Scale of Hardness हे हार्डनेस मोजण्यासाठी वापरण्यात येणारे प्रमाण आहे.
Q. गोरिला ग्लास चा शोध कधी लागला?
2008 मध्ये मोबाईल उपकरणासाठी जगात सर्वात आधी कॉर्णिंग गोरिला ग्लास 1 चा शोध लागला होता.
निष्कर्ष
आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण गोरिला ग्लास नक्की काय आहे आणि त्याचा वापर काय आहे हे बघितले. गोरिला ग्लास चे फायदे आणि नुकसान समजून घेऊन आपल्याला त्याविषयी अधिकाधिक अंदाज आला असेल.
स्क्रीन स्क्रॅच आणि फुटण्यापासून वाचविण्यासाठी कॉर्निग गोरिला ग्लास चा वापर करणे तुमच्यासाठी योग्य असणार आहे. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.