लेझर प्रिंटिंग काय आहे? | What is laser printer in Marathi
प्रिंटिंग क्षेत्रात भारताने आणि संपूर्ण विश्वाचे केलेली प्रगती ही उल्लेखनीय आहे. कागदावर डॉटच्या माध्यमातून केली जाणारी प्रिंटिंग आता अतिशय जलद गतीने अगदी त्रिमितीय (3 डी) प्रिंटिंग देखील करत आहे. यामध्ये सर्वात महत्वाची प्रिंटिंग ही लेझर प्रिंटिंग आहे.
आजच्या या लेखात आपण लेझर प्रिंटिंग काय आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
लेझर प्रिंटिंग काय आहे? । What is Laser Printing in Marathi
कागदावर छपाई करण्यासाठी लेझर प्रिंटिंग हे एक महत्वाचे तंत्रज्ञान सध्या वापरात आणले जात आहे. या आधी इंकजेट, इंकटँक सारख्या अनेक प्रकारच्या छपाई तंत्रज्ञानाचा शोध आणि वापर करण्यात आला मात्र लेझर प्रिंटिंग हे त्यातील सर्वात जास्त वेगवान छपाई तंत्रज्ञान आहे.
लेझर प्रिंटिंग च्या माध्यमातून ब्लॅक अँड व्हाईट आणि रंगीत प्रिंटिंग करता येते. लेझर टेक्नॉलॉजी ही जलद गतीने काम करण्यासाठी सध्या सर्वच क्षेत्रात वापरली जात आहे.
लेझर प्रिंटर काम कसे करते?
लेझर प्रिंटर चे कार्य हे इतर प्रिंटर पेक्षा अगदी वेगळे असते. यामध्ये कंप्युट करून येणारी माहिती ही सर्वात आधी लेझर बिम ला समजते. लेझर बिम ही मिळालेल्या माहितीनुसार लेझर प्रिंटर मधील प्रिंटिंग ड्रम नावाच्या उपकरणांवर इलेक्ट्रिक चार्ज निर्माण करते.
या इलेक्ट्रिक चार्जच्या माध्यमातून ड्रम वर एक इलेक्ट्रॉस्टेटिक इमेज बनत असते. याच इलेक्ट्रिकल चार्ज झालेल्या भागावर लेझर प्रिंटर मध्ये असलेले पावडर सारखे टोनर चिटकून बसते. ज्या कागदावर प्रिंट करायची आहे त्यावर ड्रम फिरविला जातो. यावरील टोनर पावडर पेपर वर ट्रान्स्फर होत असते.
लेझर प्रिंटर मध्ये निर्माण होणारी उष्णता आणि ड्रम वरून लावला जाणारा प्रेशर यामुळे ती पावडर कागदावर अगदी घट्ट चिटकते. या निर्माण झालेल्या उष्णते मुळे कागद हा प्रिंट झाल्यानंतर गरम लागतो.
लेझर प्रिंटर चे प्रकार
- मोनोक्रोम लेझर प्रिंटर
आपल्याकडे याच प्रकारचे लेझर प्रिंटर हे मुख्यतः वापरले जातात. कारण यांची खरेदी किंमत देखील कमी असते आणि जास्तीत जास्त प्रिंट काढता येतात.
- कलर लेझर प्रिंटर
रंगीत छपाई करण्यासाठी कलर प्रिंटर वापरले जातात. त्यासाठी टोनर मध्ये वेगवेगळ्या रंगाच्या पावडरचा वापर केला जातो.
- पर्सनल लेझर प्रिंटर
घरगुती कामासाठी लेझर प्रिंटर मध्ये पर्सनल लेझर प्रिंटर वापरले जाते. बाकी लेझर प्रिंटर हे कार्यालयीन कामांसाठी म्हणजेच जास्त लोड साठी वापरले जातात.
- Workshop लेझर प्रिंटर
ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात छपाई करायची असते तेव्हा workshop प्रिंटर कामाला येतात.

लेझर प्रिंटर चे फायदे
- लेझर प्रिंटर वर छपाई केलेले कागद हे उच्च दर्जाचे असतात. त्यामध्ये प्रिंटिंग क्वालिटी खूप छान आणि स्पष्ट असते.
- लेझर प्रिंटर वर ड्रम फिरवणे आणि उष्णतेने प्रेशर देऊन चित्र आणि छापणे यासारख्या गोष्टी जास्त वेळ घेतात मात्र इतर कार्य अधिक जलद गतीने होत असल्याने सर्वात वेगवान प्रिंटर मध्ये लेझर प्रिंटर चे नाव घ्यावे लागते.
- लेझर प्रिंटर मध्ये टोनर वापरतात. इतर प्रिंटर प्रमाण याची शाई वेळोवेळी बदलावी लागत नाही.
- लेझर प्रिंटर हे वेगवान व जास्त प्रिंट देते. यामध्ये मेंटेनन्स खूप कमी प्रमाणात करावा लागतो. मेंटेनन्स कमी असल्याने ऑपरेशन कॉस्ट देखील कमी लागते.
लेझर प्रिंटर चे नुकसान
- लेझर प्रिंटर ची ऑपरेशन आणि मेंटेनन्स खर्च कमी जरी असला तरी सुरुवातीला लेझर प्रिंटर खरेदी करत असताना जास्त खर्च येतो.
- ब्लॅक अँड व्हाईट लेझर प्रिंटर घेणार असाल तर तो स्वस्त मिळतो मात्र रंगीत लेझर प्रिंटर चा खर्च खूप जास्त असतो.
- एकदा वापरलेला टोनर हा शक्यतो पुन्हा वापरता येत नाही. त्यामुळे त्यासाठी लागणारा खर्च वाढतो आणि वापरलेला टोनर फेकून दिल्याने पर्यावरणाची हानी देखील होते.
FAQ
Q. लेझर प्रिंटर ची किंमत किती असते?
लेझर प्रिंटर घेणार असाल तर त्याची साधारण किंमत ही 12 हजार पासून पुढे सुरू होते. क्षमता आणि वेगाअनुसार त्याची किंमत जास्तीत जास्त वाढत जाते.
Q. लेझर प्रिंटर हे किती वर्षे चालू शकत?
ब्लॅक अँड व्हाईट लेझर प्रिंटर जवळपास 10 वर्षांहून अधिक काळ चालतो तर कलर लेझर प्रिंटर हा 3 ते 5 वर्षे आरामात चालतो.
Q. लेझर प्रिंटर साठी योग्य प्रकारचा पेपर कोणता आहे?
लेझर प्रिंटर साठी उत्तम दर्जाचा पेपर वापरणे गरजेचे आहे कारण साधा पेपर हा उष्णता आणि प्रेशरणे चांगल्या दर्जाच्या प्रिंट देऊ शकत नाही.
Q. लेझर प्रिंटर कसे रिपेअर करतात?
लेझर प्रिंटर मध्ये मुख्यतः टोनर चा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे शक्यतो टोनर बदलून लेझर प्रिंटर रिपेअर करता येतात.
Q. लेझर प्रिंटर मधून 1 मिनिटात किती प्रिंट निघू शकतात?
ब्लॅक अँड व्हाईट लेझर प्रिंटर 1 मिनिटात जवळपास 20 ते 25 प्रिंट काढू शकते.
निष्कर्ष
तुम्हाला जर जास्त प्रमाणात प्रिंट काढायच्या असतील आणि तुमच्याकडे वेळ पण कमी असेल तर अशा वेळी लेझर प्रिंटर कडे जावे. लेझर प्रिंटर हे घरघुती कामांसाठी सुद्धा मिळते. त्यामुळे छोट्या क्षमतेचा लेझर प्रिंटर घेणे देखील एक योग्य निर्णय असेल.
दुकानांसाठी आणि ऑफिसाठी लेझर प्रिंटर एक उत्तम पर्याय आहे. जलद गतीने आणि जास्तीत जास्त स्पष्ट प्रिंटिंग मुळे तुमचे ग्राहक देखील रिझल्ट बघून खुश असतील.