Connect with us

प्रेम

प्रेम काय असते?

Published

on

marathilekh.com

प्रेम म्हणजे बालपण आणि त्याने स्वतःच शुद्धलेखन पूर्ण असताना माझ्यासोबत खाल्लेली छडी.

प्रेम म्हणजे तुला तो आवडतो ना असं मैत्रिणीने पाहिल्यांदा विचारताचं हृदयात भरलेली धडकी.

प्रेम म्हणजे आजोबांना भरवलेला घास.

प्रेम म्हणजे माझी चार महिन्याची चमकत्या डोळ्यांची भाच्ची.

प्रेम म्हणजे घरातून भांडून आल्यावर तुझं तू खर्चाचं बघायचं अस दटावून सांगितल्यानंतर फोनवर पैसे हवेत का, विचारणारे वडील.

प्रेम म्हणजे घरी न जाण्याचा माझा निर्णय पक्का असताना, मी आजारी आहे, ये भेटायला अस खोटं बोलणारी माझी आज्जी.

प्रेम म्हणजे आज्जी गेल्यावर आमच्या नकळत रात्री रडणारे माझे आजोबा.

प्रेम म्हणजे पहाटे चार वाजता उठून गरम गरम जेवण बनवून पहिल्या गाडीने पाठवणारी माझी आई.

प्रेम म्हणजे तूझं अजून जॉबचं नक्की नाहीए, तर आम्ही आज पार्टी देतो तुला म्हणणारे मित्रमैत्रिणी.

प्रेम म्हणजे माझं गावातील घर, घरातील माणसं आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे शहरातील मित्रमैत्रिणी म्हणजे दुसरं घरच नाही का…❤️

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *