रिलेशन | What is Relation in Marathi

0
419
What is relation in marathi
What is relation in marathi

रिलेशन म्हणजे मराठीत नाती खर तर हा विषयच खूप नाजूक आहे .

निभावले तर नाती टिकवली तर नाती तर अशी ही नाती आपण आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठे तरी जपून ठेवली पाहिजेत. जी नाती खरी जपली जातात तीच नाती टिकतात. नाती जर बिखरली किव्हा जर का त्या नात्यात दरी निर्माण झाली कि ती नाती कधीच टिकत नाहीत.

जगातले सर्वात सुंदर नाते हे आपल्या आईवडिलांशी असते.पण आपण मात्र नाती विसरत चाललो आहोत. नाती म्हणजे आपल्या आयुष्यातील जंक्शन्स आहेत.आपल्या आयुष्यातील सर्वात पहिले जंक्शन म्हणजे आईवडील . आपल्या आयुष्याच्या सुसाट गाडीला लगाम घालणारे जन्क्शन. आपल्या जीवनाच्या रेल्वेचे हे सर्वात महत्वाचे जंक्शन. हे जंक्शन स्वयंभू आहे. आपल्या आयुष्याच्या रेल्वे गाडीचे हे महत्वाचे जन्क्शन आहे तिथून पुढे आपल्या जीवनाचा प्रवास चालू होतो. त्याच्यानंतर दुसरे जंक्शन येते ते पती पत्नीचे हे जंक्शन पण खूप महत्वाचे जंक्शन आहे.

आईवडिलांतर पती व पत्नीच एकमेकांचे आधारस्तंभ असतात. तर अशी ही दोन महत्वाची जंक्शनस आहेत. ह्या जंक्शनवर कधीच कुठल्याही प्रकारची गर्दी नसते. तसेच कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ देखील नसतो . म्हणून आईवडील व पतीपत्नी ही दोनच नाती अशी आहेत कि जी आपण समजून घेत नाही. ह्याला कारण अविश्वास. कारण विश्वासावरच खरी नाती अवलंबून असतात. ते कोणी कधीच नाकारू शकणार नाही. ह्याला तुम्ही काय किंवा मी काय कोणीच अपवाद असूच शकत नाही. आपल्या सर्वाना जीवन हे एकदाच मिळते. हे परमेश्वराने आपल्याला दिलेले अमूल्य असे वरदान आहे.

आईवडील : आज आपण जे कोणी आहोत ते आईवडिलांमुळेच. त्यांच्यामुळेच आपल्याला हे सुंदर जग बघायला मिळते आहे. त्याच्या ममतेचे ऋण कधीच कोणी चुकवू शकणार नाही. आज त्याच आईवडिलांना आपण वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतो हे खूप दुर्दैवी आहे.

पतिपत्नी : पतिपत्नीचे नाते हे नाते पण जगातील सर्वात महत्वाचे पण नाजूक असे नाते आहे. पतिपत्नीच्या नात्याला कधीच तडा जाता कामा नये. एकदा का त्या नात्याला तडा गेला कि घटस्फोटाचे वावटळ आलेच म्हणून समजा. म्हणून नेहमी ह्या खऱ्या नात्यांचा आपण नेहमीच आदर केला पाहिजे तरच ही नाती कायम टिकतील.

मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here