मुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही?

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ।

काय भुललासी वरलिया रंगा ॥

संत चोखामेळा महाराजांचा हा अभंग प्रसिद्ध आहे़.

डोंगा म्हणजे वाकडा… ऊस वाकडा असू शकतो. पण त्याच्या पासून तयार झालेला रस मधुरच असतो ना.

व्यक्तीचं दिसणं हे निसर्गाच्या हातात आहे, आपल्या नाही. त्यामुळे या गोष्टीचा आधार घेवून कोणाला नाकरणं चूक आहे.

पण समाजात ही मनोवृत्ती दिसून येते की गोरा रंग हवा. मुख्यत्वे मुलगी गोरीच हवी हा आग्रह दिसून येतो.

मुलीचं शिक्षण, तिच्यावरचे संस्कार, तिचा स्वभाव या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त रंगाला प्राधान्य दिलं जात. म्हणजेच आपण अंतःकरण न बघता फक्त वरवरचा रंग बघतो.

कारण गोऱ्या रंगाची भुरळ भारतीय समाजावर आहे. ती का आहे? हे मलाही सांगता येणार नाही.

पण ही मानसिकता बदलावी अस मात्र नक्की वाटत

Leave a Comment

x