महिलांना उंच टाचेच्या सँडल्स घालणे आवडते का?

सरसकट सर्व महिलांना उंच टाचेच्या चपला घालणे आवडते असं म्हणणं चुकीच ठरेल. माझ्या माहितीतील अनेक जणी आहेत ज्यांना उंच टाचांची पादत्राणे वापरणं त्रासदाम्हणजे यक आणि अनावश्यक वाटतं.

मात्र हौसेने उंच उंच टाचांचे चप्पल वापरणारा एक वर्ग आहेच. यात फॅशन हा एक मुद्दा आहे. दुसर म्हणजे सोय. कुठलाही हाय फॅशन लूक हाय हील्सशिवाय पूर्ण होत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता दुसरा मुद्दा सोय.. हे अशासाठी की बरेच भारतीय कपडे हे घोळदार असतात मग ती साडी असेल, घागरा असेल किंवा पतियाला सलवार आणि अनेक वेस्टर्न कपडे, त्यातही गाऊन हे घोळदार असतात.

अशा कपड्यांसोबत सपाट चप्पल वापरले तर कपड्यांचे काठ जमिनीला जास्त प्रमाणात घासले जाऊन कपड्यांची वाट लागते. त्यामुळे अशा कपड्यांसोबत थोडेसे उंच टाचांचे चप्पल किंवा बूट वापरले तर कपडा जमिनीपासून थोडा वर उचलला जातो आणि तुमचा आवडता ड्रेस चांगला टिकतो. उंचीही थोडीशी वाढते, व्यक्तिमत्त्वाला थोडा उठाव येतो (हे बरंचस मानसिक पण तरीही महत्त्वाचंच)

त्यामुळे मला वाटतं ज्यांना हाय हील्स वापरणं नीट जमतं त्या अगदी आवडीने घालतात.

Leave a Comment

x