या मीलनी रात्र ही रंगली | Ya Meelani Ratra Hi Rangali Marathi Lyrics
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले , सुधीर फडके
चित्रपट – जावई विकत घेणे आहे
या मीलनी रात्र ही रंगली
तू दर्पणी पाकळी चुंबिली
टिपले ओठ मी, आली ही नशा
चल ये पाखरा, निजल्या या दिशा
तू-मी जागे, दुनिया झोपली
हळवे पाश हे, विळखा रेशमी
झरले चांदणे, भिजले चिंब मी
फुलले, गाते, प्रतिमा लाजली
विझली आग ही, विझला हा दिवा
अजुनी प्रियतमा, जवळी तू हवा
हलके, हलके, सुषमा जागली