येशिल कधी परतून | Yeshil Kadhi Partun Marathi Lyrics

येशिल कधी परतून | Yeshil Kadhi Partun Marathi Lyrics

गीत – वि. स. खांडेकर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – आशा भोसले ,  लता मंगेशकर
चित्रपट – अंतरीचा दिवा

येशिल कधी परतून ?
जिवलगा, येशिल कधी परतून ?
वाट पाहू किती ? कुठे दिसे ना, तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन
जिवलगा, येशिल कधी परतून ?
हिरवे सोने हे दसर्‍याचे हाति जाई सुकून
गोड गुपित मम सांगु कुणाला ? गेले बाई भिऊन
जिवलगा, येशिल कधी परतून ?
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरी ये, भाऊराया, जाऊ नको विसरून !
जिवलगा, येशिल कधी परतून ?

Leave a Comment