येउनी स्वप्‍नात माझ्या | Yeuni Swapnat Majhya Marathi Lyrics

येउनी स्वप्‍नात माझ्या | Yeuni Swapnat Majhya Marathi Lyrics

गीत – देवकीनंदन सारस्वत
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – पुष्पा पागधरे


येउनी स्वप्‍नात माझ्या तू सख्या जाऊ नको रे
मी तुझ्या स्वप्‍नात येते तू कुणा सांगू नको रे

याद गहिर्‍या वेदनेची आज का उठते उरी
पाहुनी स्वप्‍नात मीलन मीच होते बावरी
धुंद झालेल्या किनारी नाव तू नेऊ नको रे

स्पर्श होता आसवांचा थरथरे का पापणी
धन्य मी झाले सख्या प्रीतीत वेड्या न्हाउनी
मी न माझी राहिले लाजून, तू पाहू नको रे

Leave a Comment

x