झरा प्रीतिचा का असा | Zara Preeticha Ka Asa Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – सुमन कल्याणपूर
चित्रपट – मल्हारी मार्तंड
झरा प्रीतिचा का असा आटतो रे
कशी काय बोलू गळा दाटतो रे
तुझे लग्न झाले, असे ऐकले मी
तुझे नाव तेव्हा दुरी टाकले मी
जिव्हाळा पुन्हा का तुझा वाटतो रे
मिळे सागरासा पती त्या सतीला
मुळी डाग नाही तुझ्या इज्जतीला
उरी जाळ माझ्या उगा पेटतो रे
जळे जीव जैसी वडी कापराची
अपेशी जिण्याला कळा ये धुराची
इमानास धोका कसा भेटतो रे