झुळझुळे नदी ही बाई | Zulzule Nadi Hi Baai Marathi Lyrics
गीत – कवि संजीव
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – उषा मंगेशकर , मीना खडीकर
चित्रपट – थोरातांची कमळा
झुळझुळे नदी ही बाई
देहलतेला शीतल करुनी आनंदाने गाई
पानफुलांनी तरुवर फुलती
पाण्यावरती तरंग झुलती
सुरेल मुरली नादें घुमते ती अंब्याची राई
सुखात का ग खुपते काही ?
श्याम सावळा भेटत नाही
राधेला का छळिती गोपी, कळत कसे ग नाही
या पाण्यावर हृदय उमलते
हृदयातुनि का गुपित उकलते
नको गुपित ते उकलाया ग, अबोलीच मी राही