भारतामध्ये मेडिकल स्टोर कसे सुरू करावे | Medical Business Idea in Marathi

भारतामध्ये मेडिकल स्टोर कसे सुरू करावे | Medical Business Idea in Marathi

मित्रांनो आज आपण मेडिकल स्टोर बिजनेस आयडिया बद्दल जाणून घेणार आहोत. Medical store किंवा फार्मसी चे दुकान एक सदाबहार चालणारा बिझनेस आहे, ज्यावर कोणत्याही संकटाचा कसलाही परिणाम पडत नाही. भारतामध्ये दिवसेंदिवस हेल्थ सर्विसेस बिजनेस मध्ये वाढ होत आहे. जर तुम्हाला देखील चिकित्सा क्षेत्रामध्ये आवड असेल आणि एक चांगली भांडवल तुमच्याकडे असेल, तर मेडिकल स्टोअर कसे सुरु करावे, याबद्दल हे आर्टिकल तुम्ही वाचू शकता कारण ही एक चांगली बिझनेस आयडिया आहे.

मेडिकल शॉप किंवा फार्मसी स्टोअर ही एक अशी जागा किंवा दुकान असते जिथे स्वास्थ्य संबंधित वेगवेगळे प्रोडक्ट्स आणि औषधे उपलब्धअसतात. फार्मसी चे दुकान एक असे आउटलेट असते जिथे आजारी व्यक्तींना किंवा कस्टमरला चिकित्सकाच्या किंवा डॉक्टरच्या चिट्टी / receipt आणि रिसिप्ट शिवाय मिळणाऱ्या सर्व औषधे असतात.

भारतामध्ये मेडिकल स्टोर कसे सुरु करावे | Medical Business Idea in Marathi

मेडिकल शॉप किंवा फार्मसी स्टोअरला छोट्या किंवा मोठ्या दोन्ही स्तरावर सुरू केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला बी फार्मा किंवा डी फार्मा किंवा एम फार्मा यामधील कोणतीही एक मेडिकल स्टोअर साठी लागणारी आवश्यक डिग्री करावी लागेल. आज काल जे मेडिकल किंवा फार्मा कंपनीज चालवतात ते स्वतः हा कोर्स न करता, कोर्स केलेल्या कोणत्याही फार्मासिस्टला कामाला ठेवतात. कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल उपलब्ध असते. असे तुम्ही छोट्या स्तरावर देखील करू शकता पण यासाठी तुम्हाला आधी भांडवल गुंतवावे लागेल.

मेडिकल स्टोर चे लायसन्स घेण्यासाठी फार्मसी कोर्सची आवश्यकता पडते. आजच्या या लेखामध्ये आपण मेडिकल स्टोर कसे सुरु करावे याबद्दल सर्व माहिती बघणार आहोत.

मेडिकल स्टोअर साठी लागणारे कोर्स | डिग्री शिवाय मेडिकल स्टोर कसे सुरु करावे 

जर तुम्हाला फार्मसी कोर्स शिवाय मेडिकल स्टोअर सुरू करायचे असेल, तर तुम्हाला कोणत्याही फार्मासिस्टला नियुक्त करावे लागेल त्याचबरोबर त्याच्या नावावर लायसन्स असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला फार्मासिस्टला नियुक्त करायचे नसेल तर तुमच्याकडे हा कोर्स असणे गरजेचे आहे. फार्मसी व्यतिरिक्त विविध कोर्सेस जसे की डिप्लोमा कोर्स, मास्टर डिग्री, डॉक्टर डिग्री आणि बॅचलर डिग्री आहेत.

मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी कोणती डिग्री आवश्यक असते?

बी. फार्मा: ह्या डिग्री चा पाठ्यक्रम तीन वर्षाचा असतो, त्याचबरोबर डिग्री झाल्यावर तुम्हाला कोणत्याही फार्मा कंपनीकडून एक महिन्याचे औद्योगिक प्रमाणपत्र मिळवायचे असते. बारावी नंतर तुम्ही हा कोर्स करू शकता. यासाठी तुम्हाला सायन्स स्ट्रीम निवडणे आवश्यक आहे.

एम. फार्मा: ही डिग्री बी फार्मा नंतर केली जाते. ज्यासाठी बी फार्मा मध्ये तुम्हाला मिनिमम 50 टक्के मार्क्स असणे गरजेचे आहे.

डी . फार्मा: हा डिप्लोमा दोन वर्षांचा असतो जो 12 वी नंतर तुम्ही करू शकता.

फार्मा. डी: याला डी फार्मा, किंवा बी फार्मानंतर केले जाऊ शकते.

आपल्या राज्यातील फार्मसी कौन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. फार्मसी हा डिग्री कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही फार्मसीस्ट तर बनता परंतु तुमचे रजिस्ट्रेशन फार्मसी कौन्सिल मध्ये करणे गरजेचे असते.ही प्रक्रिया ऑनलाइन देखील केली जाते. यानंतर तुम्ही रजिस्टर फार्मसीस्ट या श्रेणीमध्ये गणले जाता. आवश्यक डॉक्युमेंट सबमिट करून तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करू शकता.

Medical Business Idea in Marathi
Medical Business Idea in Marathi

फार्मसी दुकानासाठी स्थान निवडणे

प्रत्येक बिझनेस चे स्थान त्याचे यश ठरवते. यासाठी तुम्ही मेडिकल स्टोअर ची जागा निवडण्यासाठी एखादी योग्य जागा निवडा. तुम्ही कोणत्याही हॉस्पिटल किंवा क्लिनिकच्या जवळ तुमचे स्टोअर शॉप सुरू करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी देखील तुमचे मेडिकल स्टोअर सुरू करू शकता. मेडिकल शॉपसाठी गोळ्या,औषधे खरेदी करणारे लोक हवे असतात जे तुम्हाला क्लिनिक, हॉस्पिटल किंवा मार्केट च्या ठिकाणी मिळतात.

मेडिकल शॉप साठी लागणाऱ्या लायसन्स चे प्रकार

मेडिकल स्टोअर छोटे असो किंवा मोठे त्यासाठी, ड्रग लायसन्स घ्यावेच लागते. प्रत्येक फार्मसी व्यवसायाला केंद्रीय औषधी माणिक नियंत्रण संघटना आणि राज्य औषधी मानक नियंत्रण संघटन कडून औषधाचे लायसन्स प्राप्त करावे लागते. ड्रग लायसन्स चे दोन प्रकार आहेत.

1. रिटेल ड्रग लाइसेंस: सामान्य केमिस्ट चे दुकान चालवण्यासाठी तुम्हाला या लायसन्सची आवश्यकता असते ज्यासाठी तुम्हाला संचालन सुरू करण्यासाठी न्यूनतम शुल्क जमा करण्याची आवश्यकता असते. यामध्ये ड्रग लायसन्स केवळ त्याच व्यक्तीला दिले जाते ज्याने कोणत्याही विश्वविद्यालय किंवा एखाद्या संस्थानाकडून फार्मसी ची डिग्री किंवा डिप्लोमा केलेला आहे. या प्रकारचे लायसन मिळवल्यानंतर तुम्ही किरकोळ वस्तू विकू शकता.

2. घाऊक (होलसेल) औषध परवाना: जर तुम्हाला घाऊक म्हणजेच होलसेल मध्ये औषधांचा व्यापार करायचा असेल, तर यासाठी तुम्हाला हे लायसन्स घ्यावे लागेल. रिटेल ड्रग लायसन्स च्या विपरीत, आवेदकाला नियम आणि विविध निर्दिष्ट सेट चे पालन करण्याची आवश्यकता नसते. हे लायसन्स इशू केल्यानंतर काही प्रतिबंध लावले जातात ज्याचे पालन करणे आवश्यक असते.

मेडिकल स्टोर लाइसेंस फीस

मेडिकल लायसन्स साठी सर्वसामान्य डॉक्युमेंट ची आवश्यकता असते. सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या राज्यातील state drugs standard control organization कडे लायसन्ससाठी अप्लाय करा. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही statedrugs.gov. in साइटवर जाऊन माहिती घेऊ शकता. मेडिकल स्टोअर लायसन्स मिळवण्यासाठी तुमचे जवळपास तीन ते पाच हजार रुपये खर्च होतील.

स्थानिक घाऊक विक्रेत्याशी संपर्क साधा

जर तुम्हाला औषधे घाऊक दरात विकायचे असतील तर तू मला होलसेलर ची गरज भासेल, जो तुम्हाला घाऊक किमतीमध्ये मेडिकल स्टोअर साठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आणि औषधे देऊ शकेल. जर तुमचा बिजनेस मोठा असेल तर तुम्ही डायरेक्ट औषधी बनवणाऱ्या कंपनीकडून देखील सामान मागू शकता. व्यापार सुरू केल्यावर तुम्ही सुरुवातीला स्थानिक घाऊक विक्रेत्याकडूनच सामान विकत घ्या आणि तुमचा बिजनेस वाढल्यानंतर तुम्ही औषधे बनवणाऱ्या कंपन्यांसोबत संपर्क साधू शकता.

FAQs for Medical business ideas in Marathi

Q. केमिस्ट शॉप एक लाभदायक व्यवसाय आहे का?

A. कोणताही केमिस्ट व्यवसाय किंवा मेडिकल स्टोअर हा लाभदायक असू शकतो. बरेच व्यवसायिक या व्यवसायातून खूप नफा कमवत आहेत. त्याचबरोबर ओटीसी (ओव्हर द काउंटर) औषधे किंवा पेटंट औषधांचे दुकान देखील खूप नफा मिळवून देऊ शकते.

Q. मेडिकल स्टोअर मध्ये किती प्रॉफिट आहे?

A. घाऊक मेडिकल स्टोअर चे उत्पन्न दर महिन्याला 5 ते 30% असू शकते. वेगवेगळ्या औषधांवर वेगवेगळे मार्जिन असते.

वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स वर वेगवेगळे मार्जिन असते जसे की

  • ओटीसी (ओवर-द-काउंटर) औषधे.
  • ब्रांडेड प्रिस्क्रिप्शन उत्पादने.
  • जेनेरिक औषधे.
  • Trapped Products
  • ब्रांड-विशिष्ट सवलत असणारा आइटम.

Q. मेडिकल स्टोअर्स सुरू करण्यासाठी कोणत्या डिग्री ची आवश्यकता असते?

A. भारतामध्ये मेडिकल दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 10 वी नंतर विज्ञान शाखा निवडायची आहे. 12 वी पास झाल्यानंतर, तुम्हाला फार्मसी मध्ये डिप्लोमा करायचा आहे. फार्मसीमध्ये तुमचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तुम्ही मेडिकल शॉप च्या लायसन्स साठी अप्लाय करू शकता.

Q. जेनेरिक औषधांचा व्यवसाय लाभदायक आहे का?

A. कोणताही जेनेरिक औषधांचा व्यवसाय देखील व्यवसायिकांसाठी लाभदायक ठरू शकतो. यासाठी तुम्ही फ्रॅंचाईजी देखील घेऊ शकता.

Q. फार्मसी मध्ये डिप्लोमा किती वर्षाचा असतो?

A. फार्मसी मध्ये डिप्लोमा हा दोन वर्षांचा पाठ्यक्रम आहे.

Q. मेडिकल स्टोअर कोण सुरू करू शकते?

A. ज्या व्यक्तीकडे फार्मसी लायसन्स आहे तो व्यक्ती मेडिकल स्टोअर खोलण्यासाठी पात्र मानला जातो. एक योग्य फार्मासिस्ट बनण्यासाठी तुम्ही बी फार्म किंवा एम फार्म डिग्री प्राप्त करू शकता.

Q. नर्स फार्मसी खोलू शकते का?

A. नाही. “ द फार्मसी ऍक्ट 1948” आणि द नर्सिंग कौन्सिलिंग ऍक्ट च्या अंतर्गत एक नर्स भारतामध्ये फार्मसी किंवा मेडिकल स्टोअर खोलू शकत नाही.

Q. डी फार्म केल्यानंतर मी मेडिकल स्टोर करू शकतो का?

A. डी फार्मा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्यातील फार्मसी कौन्सिल मध्ये स्वतःला रजिस्टर करावे लागते. आणि अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. या प्रक्रियेसाठी तुम्हाला जवळपास 45 दिवसांचा कालावधी लागतो त्यानंतर तुम्ही स्वतःचे मेडिकल स्टोअर सुरू करू शकता.

तर मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला आता Medical Business Idea in Marathi चा हा लेख वळून भारतामध्ये मेडिकल स्टोर कसे सुरू करावे, कुठे सुरु करावे आणि हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्या डिग्री ची गरज लागेल हे समजले असेल. तुमच्या अजूनही काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

What is cryptocurrency in Marathi

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment